टॉप बातम्या

अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज सत्तार ऊर्फ ‘टापू’ यांच्या प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्‌घाटन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : प्रभाग क्रमांक 9 चे अधिकृत अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज सत्तार ऊर्फ (टापू) यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन आज पंचशीलनगर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. प्रारंभी अतिथींच्या हस्ते रिबीन कापून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी टापू यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्‌घाटन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उमेदवार अब्दुल हाफिज सत्तार यांनी स्वतःचा परिचय देत प्रभागातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच “बादली” या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
संविधान दिनानिमित्त त्यांनी प्रभागातील लूंबिनी बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. तसेच तथागत बुद्धांना वंदन करून सामाजिक सौहार्द आणि विकासाचा मार्ग स्वतःचा ध्येय असल्याचे सांगितले.

या सोहळ्यात शेकडो समर्थकांनी उपस्थित राहून आपला सक्रीय सहभाग नोंदवला. प्रभागात त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्सुकतेचे व सकारात्मक वातावरण असून अब्दुल हाफिज सत्तार ऊर्फ टापू हे प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();