टॉप बातम्या

वणीत भाजपाचा दमदार जल्लोष,नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे एकाचवेळी नामांकन दाखल!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या उत्साहात उमेदवारी नामांकन दाखल केले. रंगनाथ स्वामी मंदिरातून शक्ती प्रदर्शनला सुरुवात करत सुभाषचंद्र बोस,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मिरवणूक निवडणूक कार्यालयात पोहचली. शहरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या नामांकन मिरवणुकीने संपूर्ण शहरात निवडणूक वातावरणाला आणखी रंग चढवला.
विशेष म्हणजे, भाजपच्या उमेदवारी दाखल प्रक्रियेदरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या लाडक्या बहिणींनी भव्य स्वागत करून संघटनेप्रति तसेच उमेदवारांप्रति आपला मोलाचा पाठिंबा दर्शवला. डोल–ताशांच्या निनादात, घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात अर्ज दाखल होताच उत्साहाचा माहोल अधिकच शिगेला पोहोचला. त्यानंतर मिरवणुकीचा समारोप श्री संत जगन्नाथ महाराज देवस्थान येथे झाला.
होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीला वेग येत असून भाजपच्या या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

आज सर्व २९ नगरसेवक व नगराध्यक्षा यांनी आपल्या उमेदवारी अर्जांचे नामांकन एकाचवेळी दाखल केले.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महिला आघाडी तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();