टॉप बातम्या

एक सच्चा आणि निस्सीम कार्यकर्त्याचा केला काँग्रेसने सन्मान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी झरी मारेगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून मागील 26 वर्षापासून पक्षासोबत काम करणारे विकेश भास्करराव पानघाटे यांची आज वणी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली.

अगदी विद्यार्थी दशेत असताना NSUI च्या तालुका अध्यक्षचे कार्य करत असताना त्यांनी अनेक महाविद्यालईन निवडणुका लढविल्या व युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्या नंतर त्यांनी अनेक आंदोलने सुद्धा केली. तर जेष्ठ राजकारणी व्यक्तीसोबत काम करून पक्षाच्या जडणघडण मधील संघटनात्मक बाबींमध्ये व निवडणुकीच्या कार्यकाळात कार्यशैलीवर भरीव काम करून पक्षाला योग्य तो सन्मान मिळून देण्यासाठी अहोरात्र झटणारे व एक वचनी बहूआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहेत. 

कुठल्याही राजकीय घराण्याचा वारसा नसताना फक्त कर्तृत्वाने त्यांनी विश्वास संपादनं करून पक्षाच्या ध्येय धोरणाले प्राथमिकता देऊन त्यांनी आजगायत कार्य केलेले आहे. काँग्रेस पक्षाचे कार्य करीत असताना त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांना काँग्रेस पक्षाने शहर अध्यक्षपदी काम करण्यास संधी दिली व सोबतच कालांतराने त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ओबीसी सेलचे सुद्धा अध्यक्ष करण्यात आले, असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून विकेश पानघाटे यांचे नावलौकिक आहे. सोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा भरीव कार्य केलेलं आहेत. गुढी पाढवा उस्तव समिती, स्वराज्य युवा संघटना, लढा संघटना, लढा विद्यार्थ्यांच्या हक्काचा या इतरत्र संघटनेत आपली कार्य कुशलता दाखवून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे अतिशय महत्त्वाची भूमिका पक्षांनी दिलेली आहे ती म्हणजे कार्यालयीन काम यामध्ये त्यांना सुद्धा आपल्या कामाची चुणूक दाखवलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी तर चक्क वणी झरी मारेगाव तिन्ही तालुक्याचं प्रचार परवानगी कामांमध्ये त्यांनी पक्षाला भरभरून सहकार्य केलं या सर्वांची दखल घेत पक्षश्रेष्ठी व पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात राहून त्यांनी कार्य केलेले आहे. याच कार्याची पावती म्हणून त्यांना वणी तालुक्याच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. या सर्व निवडीचेचे श्रेय वणी झरी मारेगाव तालुक्यातील सर्व ज्येष्ठ काँग्रेस मंडळी विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, रंगनाथ स्वामी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲड. देविदास काळे, टिकाराम कोंगरे, संजय खाडे, ओम ठाकूर,विवेक मांडवकर, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, मोरेश्वर पावडे, डॉ. कावडे साहेब ह्या निवडीचे श्रेय यांना देत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();