सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ व अनुभवी नेते वसंतराव आसूटकर यांची मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा होताच तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
वसंतराव आसूटकर हे पक्षनिष्ठ, जमिनीवर कार्य करणारे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना अधिक संघटित व मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पक्षाची पकड वाढवणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू करणे हे त्यांचे प्राधान्य असेल, असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आसूटकर यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, नव्या जोमाने संघटनात्मक कामाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.