टॉप बातम्या

सौ. प्रिया अनुप काटकर नगरसेविका पदासाठी रिंगणात – प्रभाग क्र. ६ मधून उमेदवारीची घोषणा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : सामाजिक कार्यकर्त्या आणि सुशिक्षित युवा चेहरा सौ. प्रिया अनुप काटकर यांनी वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. ६ मधून नगरसेविका पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. सामाजिक कार्यात ओढ असलेल्या काटकर या महिलांमध्ये लोकप्रिय असून, स्थानिक विकास आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

“विकासाच्या वाटचालीत सर्वसामान्यांचा सहभाग असावा” असा त्यांचा संदेश असून, त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, या निवडणुकीत त्या एक मजबूत स्पर्धक ठरणार आहेत.

"सामाजिक भान असलेल्या सौ. प्रिया अनुप काटकर या प्रभागातील नागरिकांच्या विकासासाठी मनापासून प्रयत्नशील राहण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात बाळगतात."
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();