सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आगामी नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (दि.१नोव्हें.) रोजी वणी शहरातील वसंत जिनिंग हॉलमध्ये काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. बैठकीत पक्षाने एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करत, नगरपालिकेत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा संकल्प केला.
बैठकीदरम्यान काँग्रेस पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीत आणि जनतेच्या विश्वासात असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. “एकजूट, विचार आणि जनतेचा विश्वास — याच बळावर या वेळी विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तर, सर्व स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
दरम्यान, या बैठकीत शहरातील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आणि निवडणुकीतील रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण असून, वणी नगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेस पुन्हा आपली छाप सोडणार, असा विश्वास संजय खाडे यांनी व्यक्त केला आहे.