टॉप बातम्या

वणी : दिलीप कोरपेनवार सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा — १८०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : रविवारी, दिनांक १४ सप्टेंबर रोजी स्व. श्री दिलीप कोरपेनवार सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विजय चोरडिया मित्रपरिवार व स्माईल फाउंडेशन (NGO), वणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला होता.

या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून लवकरच विजेत्यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल, अशी माहिती स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली.

वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालय, छोरियालेआउट, गणेशपूर येथे ही स्पर्धा पार पडली. सुमारे १८०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. ‘अ’ गट (इ. ४ ते ५), ‘ब’ गट (इ. ६ ते ८) आणि ‘क’ गट (इ. ९ ते १२). वणी तालुक्यासह मारेगाव, झरी, पांढरकवडा, वरोरा आदी तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

विजेते विद्यार्थी

‘अ’ गटात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, डोलडोंगरगाव येथील वैभव बुटले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूलचे चिन्मय डेंगळे यांनी दुसरा क्रमांक मिळवला, तर ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलचे विहान गोसावी यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

‘ब’ गटात स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूलची स्वरा शेडामे हिने प्रथम क्रमांक मिळवला, त्याच शाळेतील अंश सेनामे यांनी दुसरा क्रमांक मिळवला, तर मायक्रोन स्टुडेंट अकॅडमी, वणी येथील सृष्टी राशीकर हिने तिसरा क्रमांक मिळवला.

‘क’ गटात लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील ओम पानघाटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूलचे गुरप्रीतसिंग मुथानेजा यांनी दुसरा, तर दर्श मदान यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

पुढील टप्प्यासाठी निवड

‘अ’ गटातून १३ विद्यार्थी, ‘ब’ गटातून १४ विद्यार्थी आणि ‘क’ गटातून १३ विद्यार्थी अशा एकूण ४० विद्यार्थ्यांची पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा लवकरच आयोजित केला जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती माध्यमांतून दिली जाईल. अधिक माहितीसाठी ७०३८२०४२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजनातील योगदान

स्पर्धेसाठी विस्तार अधिकारी रमेश बोबडे, संजय पिदुरकर, दत्तात्रय पुलेंवार, चंदू परेकर, देवेंद्र खरवडे, दिगंबर ठाकरे यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्माईल फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक पियूष आत्राम, आदर्श दाढे, डॉ. विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, भोयर सर, ताजणे मॅडम, संजय पिदुरकर, रोहित ओझा, रोनक बदखल आणि सिद्धार्थ साठे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे स्पर्धा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();