सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी कार्यालयात आपले ओळखपत्र लावणे गरजेचे आहे. परंतु शासकीय अधिकारी व कर्मचारी हे ओळखपत्र न लावता शासकीय कामे करतात. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत आपल्या पदाचे ओळखपत्र शरीराच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे जेणेकरुन समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यालयीन प्रमुखाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने दि. ७ मे २०१४ रोजी सर्व शासकीय कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे अशा सूचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या नियमाचे पालन होत नसल्यामुळे अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. नागरीकांना शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी ओळखणे कठीण होत आहे त्यामूळे कामकाजात अडथळे निर्णाण होत आहे. शासनाने १० ऑक्टोंबर २०२३ रोजी या सूचनांचा पुनरुच्चार केला होता, पोलिस कर्मचाऱ्यांना देखील शासकीय कार्यालयात प्रवेश करतांना कर्मचाऱ्यांची ओळख तपासण्याचे आदेश दिले होते तरीसुद्धा अनेक ठिकाणी नियामांचे पालन होत नाही.
नव्या शासननिर्णयानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करतांना तसेच कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख आणि विभागप्रमुख यांच्यावर सोपविष्यात आली आहे. मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने आपणांस कळविण्यात येते की नियमांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केली आहे.