सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आगामी पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चुणूक दिसू लागली आहे. यामध्ये माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार साहेब यांचे आणि मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते प्रवीण उर्फ गजू मधुकरराव यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे.
प्रवीण उर्फ गजू बोथले हे युवक नेते, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. महायुतीच्या कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून त्यांच्या नावावर पक्षात विश्वास असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास ते पंचायत समिती सदस्यपदासाठी आघाडीवर राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मारेगाव तालुक्यातील त्यांच्या मजबूत कार्यकर्त्यांचा आणि मित्र परिवारांचा पाठिंबा हा त्यांचा मुख्य बळ ठरणार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पंचायत समिती राजकारणाला नवी दिशा मिळू शकेल, असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
दरम्यान, इतर काही पक्षांकडूनही बोथले यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा असून, ते शेवटी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.