सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने वणी पोलीस स्टेशन तर्फे “Run for Unity” दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अंदाजे 150 ते 200 नागरिकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे बक्षीस वितरण नगरपरिषद वणीचे मुख्याधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात एकता आणि अखंडतेचा संदेश पोहोचवणाऱ्या या उपक्रमाने वातावरण देशभक्तीने भारावून गेले.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमादरम्यान पोलिस स्टेशन वणी तर्फे चोरी गेलेले 10 मोबाईल फोन CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले आणि ते मूळ तक्रारदारांना परत देण्यात आले. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी वणी पोलिसांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

