सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकiता दिन” उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या एकतेचा संदेश देणाऱ्या “Run for Unity” या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक यवतमाळ, पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले असून, जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव शहरातही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता (यवतमाळ) या धाव स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. “एक दौड – देश की एकता और अखंडता के लिए” या घोषवाक्याने सजलेल्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, पोलिस कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून तरुणाईत राष्ट्रभक्तीची जाणीव आणि ऐक्याचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश आहे.
अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या जोडीला वणी येथे सकाळी 7 वाजता तर मारेगाव येथेही सकाळी 7 वाजता पोलिस विभागाच्या वतीने “Run for Unity” चे आयोजन केले आहे. देशाची अखंडता, ऐक्य आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी हा उपक्रम एक प्रभावी पाऊल ठरणार आहे.