टॉप बातम्या

यवतमाळमध्ये शिवसेनेचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

यवतमाळ : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, युवा सेना कार्याध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश सरनाई यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ येथील आर्णी रोडवरील समर्थ हॉलमध्ये शिवसेनेचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात शिवसेना महिला आघाडी तसेच युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते पदग्रहण पार पडले. या प्रसंगी पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिगळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोळ, हरिहर लिंगनवार, जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव, यशवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शहर आणि तालुक्यातील महिला आघाडी व युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना या सोहळ्यात जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यात शहर महिला संघटिका रेखा मडावी, उपशहरप्रमुख साधना आस्वले, प्रभा ठेंगळे, विभाग प्रमुख सारीका चिकनकर, मंदा धोबे आणि कोमल दानखंडे यांच्या समावेशाने महिला नेतृत्वाला बळ मिळाले.

युवासेना विभागातही नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला असून, मारेगाव युवा सेना शहर संघटक म्हणून योगेश नागोसे, शहर समन्वयक वेदांत सिडाना, उपशहरप्रमुख तेजस कापसे व आशिष चिंचोलकर, विभाग प्रमुख सौरभ पोटफोडे, संकेत चोपणे, महेश मिलमिले आणि मुकेश उरकुडे यांची निवड करण्यात आली. तसेच मारेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी तन्मय सरोदे यांची निवड झाली.

या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष कल्पना गावंडे, शहर प्रमुख विजय मेश्राम, महिला आघाडी शहर प्रमुख प्रतिभा झाडे, उपतालुका प्रमुख प्रशांत भंडारी, युवासेना तालुकाध्यक्ष निखिल कालेकर तसेच इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य सोहळ्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();