सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : कुणबी समाज बहुसंख्याने शेतकरी आहेत. अनेक नैसर्गिक संकटे शेतकऱ्यावर येत असतात त्यांच्याशी लढण्याची स्वतःमध्ये ताकद निर्माण करून पुढे जाण्याची गरज आहे.शेतकऱ्यांनी खचून न जाता लढण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असले पाहिजे.कुणबी समाजातील रक्त निसर्गाशी दोन दोन हात करण्याचे आहे. स्वतःच्या कर्तुत्वाने इतर समाजाला दिशा देऊन आपल्या माध्यमातून नवा इतिहास निर्माण केला पाहिजे. असे प्रतिपादन मारेगाव येथील शेतकरी सुविधा मंगल कार्यालयात पार पडलेल्या तिरळे कुणबी समाज स्नेहमिलन व गुणगौरव सोहळाचे अध्यक्षपदावरून माजी कॅबिनेट मंत्री सुनील भाऊ केदार यांनी केले.
यावेळी या सोहळ्याचे उदघाटक नरेंद्र पाटील ठाकरे यांनी कुणबी समाजाने आपसातील वाद बाजूला सारून समाजाने संघटित होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या सोहळ्यास विशेष मार्गदर्शक असलेल्या स्नेहा टोनपे यांनी मेळाव्यास मोठ्या संख्याने उपस्थित झालेले तिरळे कुणबी समाज बांधव पाहून कुणबी समाज एकसंघपने बांधला जातो ही बाब सुखावणारी असल्याचे मत व्यक्त केले.या सोहळ्यामध्ये मारेगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार तर आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला सांत्वन करण्यात आले.
या स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष सुनीलजी केदार तर उद्घाटक नरेंद्र पाटील ठाकरे तसेच विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ स्नेहाताई टोणपे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून पांडुरंगी चौधरी, रवींद्र दरेकर, विनोदजी गोडे, गणेश बुटे, अनिलजी कडू, कोसारा सरपंच सौ.खाडे, खैरगाव सरपंच चंदू जवादे, प्रकाश पवार, नरेंद्रजी वैद्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन खडसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चित्रा दैने यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्रजी वैद्य यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मारेगाव तालुका तिरळे कुणबी समाज बांधवांचे सहकार्य लाभले.