टॉप बातम्या

खंडणी गावात अडीच वर्षांच्या बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील खंडणी गावात सर्पदंशामुळे अडीच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्नेहा दशरथ मडावी असे मृत बालिकेचे नाव असून, शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

स्नेहा घराशेजारी खेळत असताना अचानक चक्कर येऊन ती कोसळली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक तपासात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, दिवसा खेळत असतानाच सर्पदंश झाला असावा, परंतु बालिकेला ते सांगता न आल्याने योग्य वेळेत उपचार न मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();