सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : मागील वर्षी आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या सर्व अठरा संघटनांच्या माध्यमातून नागपुर येथे मोठे आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने न्या.के.एल.वडणे समिती गठीत केली.या समितीला जमातीच्या विविध संघटनांनी निवेदने देऊन २४ एप्रिल १९८५ च्या जी.आर.मधील गोंड गोवारी संदर्भातील चुकीची माहीती मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात आलेल्या मुद्यांच्या आधारे दुरुस्त करुन जमातीला न्याय द्यावा ही मागणी केली होती. तो अहवाल सकारात्मक असावा व तो त्वरीत जाहीर करुन त्या अहवालाची शासनाने अंमलबजावणी करावी याकरिता मी मा.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या सोबत जमातीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येत्या महीनाभरात लावणार असे वक्तव्य गोवारी योजना अंमलबजावणी व सनियंञन समीतीचे अध्यक्ष मा.कैलास राऊत यांनी केले.
यवतमाळ येथे आपल्या झालेल्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की राज्य शासनाने आपल्या समाजासाठी सुरु केलेल्या विकासात्मक योजना या तात्पुरत्या असुन आपले संविधानिक अधिकार मिळेपर्यंत आपले लोक शिक्षण,रोजगार व इतर बाबीपासुन वंचित राहू नये या करीताच मी ह्या समितीचे अध्यक्ष पद स्विकारले.
तत्पुर्वी शासकिय विश्राम यवतमाळ येथे आयोजित या विदर्भस्तरीय चिंतन बैठकिच्या अध्यक्ष पदावरुन बोलताना मा.माधव कोहळे म्हणाले की,आज समाजात नैराश्यचे वातावरण असुन जमातीला त्यांचे घटनादत्त आधिकार मिळाले पाहीजे यासाठी आपण मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील निरिक्षणानुसार सोनेगाव आधारित शेड्यूल्ड एरीयातील एखादी केस न्यायालयात नेऊन पुरावे व ॲफिनिटीच्या आधारे लढावी.याबाबत आजच्या बैठकीत ठराव घ्यावा व मा.के.एल.वडणे समितीचा अहवाल राज्य शासनाने लवकर जाहीर करावा या करीता मा.कैलास राऊत यांचे माध्यमातून मा.मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणविस यांच्या सोबत समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक लावावी.
बैठकी अंती वरील दोन्ही ठराव एकमताने मंजुर करण्यात आले.यावेळी मा.कैलास राऊत यांना राज्यमंञी दर्जाचे समितीचे अध्यक्ष पद प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यावेळी माधव कोहळे,सौ.अरुणाताई चचाणे व इतर मान्यवरांकडुन सत्कार करण्यात आला.सोबतच ए.पि.आय.तुषार नेवारे,माजी सैनिक दादाराव बोटरे, विधानसभा उमेदवार अविनाश सोनवने,विकास लसंते, ॲड.भास्कर नेवारे, सरपंच प्रविण मोगरे,अरुणाताई चचाने इत्यादींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने राजाभाऊ ठाकरे,सिताराम मंडलवार, महादेवराव नेवारे,ॲड.मनोज ठाकरे,शेखर लसुंते,डाॕ.लसवंते,भास्कर राऊत,नंदकिशोर कोहळे,रोशन राऊत यांचे सह अनेक मान्यवर हजर होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आयोजक संतोष वाघाडे,प्रविण मोगरे,जितेश राऊत,राजेश नागोसे,संतोष बोटरे,कमलाकर नेवारे,गजानन भोंडे,शञुघन ठाकरे,सुभाष लसंते,सतिश दुधकोहळे,निलेश चौधरी,धनराज खंडरे,बादल लसंते,अंकुश नेहारे,भुषण ठाकरे,कु.निमिषा वाघाडे यांचेसह अनेकांनी प्रयत्न केले.