सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
पांढरकवडा : महाराष्ट्रातील पुसेगाव (सातारा), संभाजीनगर,धुळे,अमरावती व केळापुर (यवतमाळ) या पाचही शासकीय विद्यानिकेतन मध्ये शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात व देश विदेशात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.काही विद्यार्थी IAS,IPS ,शास्त्रज्ञ होऊन सेवानिवृत्तही झाले आहे.या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने पुणे येथे आजी माजी विद्यार्थी,शिक्षक यांच्या महामेळाव्याचे पुढील महीन्यात पुणे येथे दिनांक १४,१५,१६ नोव्हेंबर ला आयोजन केले आहे.या पाचही विद्यानिकेतन मध्ये सध्या शिकणाऱ्या मुलांना माजी विद्यार्थ्यांकडुन प्रेरणा मिळावी, ऊज्वल यशाची परंपरा कायम राहावी व या शाळांचा दर्जा पुर्वीप्रमाणेच कायम राहावा असा उदात्त हेतु सदर मेळाव्याचा आहे.
या मेळाव्याचे आजी माजी विद्यार्थी व शिक्षकांना निमंत्रण देण्यासाठी पुसेगाव जि.सातारा येथुन निघालेल्या निमंत्रण दिंडीचे केळापुर जि.यवतमाळ येथील शासकीय विद्यानिकेतन मध्ये दिनांक ६आॕक्टोबर ला आगमण झाले.त्यावेळी केळापुर येथे पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.या निमंत्रण दिंडीत या पाचही विद्यानिकेतन मधुन शिक्षण घेतलेल्या पण आज सेवानिवृत्त व सध्या कार्यरत उच्च पदस्थ अधिकारी,उद्योजक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.यामध्ये प्रामुख्याने सर्वश्री -दिंडी प्रमुख राजेंद्र गिल,अशोक सातव,शामराव घोरपडे,मुकुंद महामुनी,गोरखनाथ कांबळे,विजयकुमार ठुबे,छगन नेरकर,दिगांबर गाडेकर,प्रभाकर वाघमारे,राहुल भोसले,पंकज वेंदे,मुझफ्फर सय्यद,गोपाल काळे,माधव कोहळे,डाॕ.सतिश कोडापे,संतोष उईके,सतिश येडमे,गजानन वाघमारे,दिवाकर मडावी,सागर प्रतापवार,योगेश उघडे,अक्षय बांगर यांचा समावेश होता.यावेळी शाळेचे कुलप्रमुख श्री.धुर्वे सर आणि अन्य शिक्षक वृंद,शाळेचे विद्यार्थी यांनी निमंत्रण दिंडीतील पाहुण्यांचे उस्फुर्थ स्वागत केले.