सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानुसार, वणी नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून, अनेक इच्छुक नेत्यांचे स्वप्न भंगले आहेत.
नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलांकडे वळवल्यामुळे आता विविध पक्षांपुढे नवीन उमेदवार शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे आदिवासी महिलांना नेतृत्वाच्या दृष्टीने सुवर्णसंधी मिळाल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत होत असले तरी इच्छुक नेत्यांमध्ये हिरमोड झाला आहे.
राजकीय वर्तुळात या आरक्षणावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अनेकांनी आदिवासी महिलांसाठी सशक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मत व्यक्त केले जात आहे. याशिवाय, स्थानिक राजकारणातील नवे पाऊल आणि बदलत्या समीकरणांचे महत्व यावर देखील चर्चा रंगली आहे.