सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : पैसा हा जगण्यासाठी आवश्यक साधन असला तरी समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा, आदर्श, रुतबा हे पैशाने विकत घेता येत नाहीत. जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी नैतिक मूल्ये, समाजकार्य, आणि सकारात्मक योगदान हाच खरा मार्ग आहे. पैसा आनंद, प्रेम आणि समाधान या आंतरिक मूल्यांची जागा घेऊ शकत नाही.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. सतीश कोडापे साहेब. समाजासाठी केलेल्या त्यांच्या मोलाच्या कार्यामुळे त्यांना आजवर 20 हून अधिक गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, ग्रामीण व शहरी आरोग्य, तसेच कुपोषण यांसारख्या विषयांवर त्यांनी अनेक मार्गदर्शक पुस्तके लिहून समाजाला आदर्श दिला आहे.
ही प्रेरणा त्यांना त्यांच्या आई–वडिलांकडून मिळाली. विशेष म्हणजे, त्यांच्या आई–वडिलांनाही भारत सरकारतर्फे राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यामुळे डॉ. कोडापे यांना मिळालेले सततचे यश आणि पुरस्कार हे त्यांच्या कुटुंबातील संस्कार व स्वतःच्या अथक मेहनतीचे फलित आहे.त्यांना नुकतेच "महात्मा गांधी रत्न अवॉर्ड 2025" ने सन्मानित करण्यात आले आहे.
मा. डॉ. कोडापे साहेब, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!