सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आनंदाच्या दिवाळी सणावर दु:खाचे सावट पसरवणारी घटना वणी तालुक्यात घडली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरई येथील तरुण शेतकरी शंकर गणपत चटप (वय ३६) यांनी २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
शंकर यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल केले असता २१ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.मौजा गोवारी (पा.) येथे सुमारे १.२९ हेक्टर सामाईक शेती आहे.
मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत.