सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : रस्त्यावर कधी तुम्ही पाहिलंय का ?
लहानग्या मुलांना दोरीवर चालत कसरत करताना,
हातात काठी घेऊन तारेवर तोल सांभाळताना?
त्यांच्या प्रत्येक पावलामागे असते उपजीविकेची झुंज
कलेतून पोट भरण्याची, मुलांचं भवितव्य घडवण्याची.
हीच ती कुटुंबं, जी तारेवर कसरत करून आयुष्य जगतात.
त्यांची मुलं जवळजवळ शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर,
आणि अत्यंत गरिबीमुळे नवीन कपड्यांपासूनही दूर असतात.याच कुटुंबांसाठी स्माईल फाउंडेशन तर्फे कपडे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सुमारे ४०% लोकांनी नवीन कपडे देऊन मनापासून सहभाग नोंदविला.
संकलित कपडे मारेगाव तालुक्यातील काही गरीब वस्त्यांमध्ये, तसेच या कलाकार कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आले.हा उपक्रम त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा ठरला.
हा कार्यक्रम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विस्तार अधिकारी मा. श्री. रमेश बोबडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या उपक्रमात सिद्धार्थ साठे, अनिकेत वासरीकर, तसेच संस्थेचे सचिव आदर्श दाढे आणि अध्यक्ष सागर जाधव उपस्थित होते.