टॉप बातम्या

फसव्या आश्वासनांवर शिवसेनेचा संताप — ऐन दिवाळीच्या दिवशीच ‘चटणी-भाकर आंदोलन’

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : दिवाळीसारख्या आनंदाच्या सणावर जिथे सर्वत्र आनंद, उजळलेली घरे आणि उत्सवाचा माहोल दिसतोय, तिथे दुसरीकडे शेतकरी मात्र संकटाच्या गर्तेत सापडला आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज वणी शिवतीर्थावर ‘चटणी-भाकर आंदोलन’ करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसोबत बसून साधी भाकरी आणि चटणी खाऊन प्रतीकात्मक निदर्शने केली. “शेतकऱ्याच्या घरात तेलाचा दिवा पेटवायला पैसा नाही, आणि सरकार फक्त घोषणांचा फुगा फुगवत आहे,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर हल्ला चढवला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या वेळी आमदार संजय देरकर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.” दिवाळीसारख्या सणावर शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडणारे हे ‘चटणी-भाकर आंदोलन’ आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();