टॉप बातम्या

शेतकऱ्यांच्या व्यथेला काँग्रेसचा आवाज — बांधावर भाकरी खाऊन सरकारचा निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ओल्या दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. यंदा राज्यात ओला दुष्काळ पडून शेतीचे मोठे नुकसान झाले असतानाही सरकारकडून शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून, त्यांच्या दृष्टीने ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या ऐक्यासाठी आणि त्यांच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी बांधा वर जाऊन भाकरी व चटणी खाण्याचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने बेसन भाकरी व ठेचा घेऊन शेताच्या बांधावरच सामूहिक भोजन केले. या प्रतीकात्मक कृतीतून सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्यात आला.

या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व मारोती गौरकार, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव यांनी केले. त्यांनी सांगितले की, “सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करून आर्थिक मदत द्यावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा उभारेल.” या कार्यक्रमात सभापती गौरी शंकर खुराना, अंकुश माफूर, आकाश बदकी यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();