टॉप बातम्या

यवतमाळ येथे शिवसेनेचा भव्य पदग्रहण सोहळा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचा भव्य पदग्रहण सोहळा यवतमाळ येथील आर्णी रोडवरील समर्थ हॉलमध्ये उत्साहात पार पडला. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते पदग्रहण करण्यात आले. या प्रसंगी पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिगळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर काका मोहोळ, हरिहर लिंगनवार, जिल्हाध्यक्ष राजूदासजी जाधव, यशवंत पवार, तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी आकाश गणात्रा, उमाकांत पापीनवार, मिसाळ ताई, इंगोले ताई, वाघाडे ताई, चंदणखेडे ताई आणि विनोदभाऊ मोहितकर उपस्थित होते.

या सोहळ्यात शिवसेना महिला आघाडी व युवासेनेच्या तालुका तसेच विभागीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. महिला आघाडी तालुका समन्वयकपदी सौ. दर्शना प्रतापराव कुमरे, उपतालुकाप्रमुख (मार्डी-कुंभा विभाग) सौ. मंगला अनिल पिंपळशेंडे, वेगाव-बोटोणी विभाग उपतालुकाप्रमुख सौ. सुवर्णा राजेश खडसे, मार्डी विभाग प्रमुख सौ. मोनाली निलेश रासेकर, कुंभा विभाग प्रमुख सौ. रवीना मारोती सुरतेकर, वेगाव विभाग प्रमुख वंदना सुरेश शेंडे व बोटोणी विभाग प्रमुख सौ. संगीता गणेश टोंगे या महिलांची नियुक्ती करण्यात आली. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

त्याचप्रमाणे युवासेना तालुकाप्रमुख निखिल कालेकर, तालुका समन्वयक दिगंबर नावडे, तालुका संघटक तुकाराम वासाडे, उपतालुकाप्रमुख विकास वैद्य व सचिन ढोके, तसेच कुंभा विभाग प्रमुख कृपाल खाडे, मार्डी विभाग प्रमुख हेमंत दानव, बोटोनी विभाग प्रमुख अमोल मत्ते, आणि वेगाव विभाग प्रमुख राहुल सुर या युवकांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष कल्पनाताई गावंडे, शहर प्रमुख विजय मेश्राम, उपतालुकाप्रमुख प्रशांत भंडारी यांच्यासह तालुका आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण सोहळा उत्साह, ऐक्य आणि संघटनशक्तीचा भव्य दर्शन घडवणारा ठरला.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();