सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : शिवसेना नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथे पदग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान युवासेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. युवा शक्तीला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून जिल्ह्यातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमात चंद्रपूर लोकसभा युवासेना समन्वयकपदी शुभम गोरे, युवासेना जिल्हा सचिवपदी प्रतीक गौरकर तर वणी विधानसभा युवासेना सचिवपदी सुमित केशवाणी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच वणी, मारेगाव आणि झरी या तीनही तालुक्यांमध्ये संघटनात्मक नियुक्त्याही पार पडल्या. यामुळे युवकांना थेट पक्षाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
या पदग्रहण सोहळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह, शिवसेनेचे नेते पराग पिंगळे, संपर्क प्रमुख सुधाकर गोरे, विनोद मोहितकर, किशोर नांदेकर आणि मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर उपस्थित होते. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते.