टॉप बातम्या

पैनगंगा नदीत युवक वाहून गेल्याने एनडीआरएफकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

महागाव : महागाव तालुक्यातील टेंभी (काळी) गावात चालू असलेल्या दुर्गादेवी उत्सवाच्या विसर्जनावेळी दुर्दैवी घटना घडली. शनिवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी मूर्ती विसर्जनासाठी महिला मंडळासह काही युवक वरुडी येथील पैनगंगा नदीपात्रात गेले असता, गणेश हौसाजी सुकळकर (रा. टेंभी) हा युवक पाण्यात पडून वाहून गेला. क्षणात घडलेल्या या घटनेमुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच महागाव तहसील प्रशासनाने तत्काळ एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. रात्रीपासूनच टेंभी, वरुडी आणि कासारबेहळ परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार मस्के, मंडळ अधिकारी रामपंडित, ठाकरे तसेच तलाठी शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून नदीपात्र परिसरातील गावकऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश सुकळकर याचा शोध रविवारी सकाळपासून एनडीआरएफचे जवान आणि नातेवाईकांच्या मदतीने सुरू आहे. पैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध कार्यात अडचणी येत असल्या तरी जवानांकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सदर युवक आढळल्यास ९४०४०३६९५९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत युवकाचा शोध सुरूच आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();