टॉप बातम्या

साधेपणातून दिला सामाजिक संदेश — सचिन भाऊ रासेकरांचा अनोखा वाढदिवस!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : साधेपणा आणि समाजाभिमुख कार्य यांचा संगम म्हणजे मोहदा ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन भाऊ रासेकर. यंदा त्यांनी आपला वाढदिवस कुठलाही वाजा-गाजा न करता, निराधार आणि गरजू लोकांना मदतीचा हात देत साजरा केला. विशेष म्हणजे या दिवशी त्यांनी निराधार नागरिकांचे अर्ज स्वतः भरून त्यांच्या योजनांसाठी मदत केली, ज्यातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रकर्षाने दिसून आली.
उपसरपंच म्हणून सचिन रासेकर यांनी अल्पावधीतच ग्रामविकासाच्या अनेक उपक्रमांना गती दिली आहे. वनहक्क, निराधार योजना, दिनदयाळ उपक्रम, घरकुल योजना, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या प्रश्नांवर ते सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामपंचायतीत लोकांचा विश्वास वाढला असून प्रत्येक नागरिकाच्या अडचणीला ते स्वतःचे कार्य मानतात.
मोहदा ग्रामपंचायतीत उपसरपंच पदावर रुजू झाल्यापासून रासेकर यांनी कामाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विकासकामात पारदर्शकता, लोकसहभाग आणि सेवा ही त्यांची ओळख झाली आहे. समाजासाठी झटणाऱ्या या युवा नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांसह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();