सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मुंबईत प्रवेश झाल्यानंतर शिंदे सेनेचे युवा नेतृत्व म्हणून पुढे आलेले विजय बाबू चोरडिया यांचे आज वणी येथे जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवर पारंपरिक तालावर घोषणाबाजी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नांदेपेरा रोड वरील विजय बाबूंनी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाला अभिवादन करून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांनी कार्यकर्त्यांना जनतेशी थेट संवाद साधण्याचे आणि शिंदे सेनेची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले.काळे आणि मुंजेकर यांचेही स्वागत करण्यासाठी यावेळी शिवसेनाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते.
या स्वागत सोहळ्यात माजी आमदार विश्वास नांदेकर यांची रणनीती फळास आली असे चित्र दिसले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेचे संघटन वणी विधानसभा क्षेत्रात अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर विजय बाबू चोरडिया यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाला, जिथे पुढील राजकीय घडामोडींवर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह माध्यमाशी बोलणार असल्याची माहिती मिळाली.