सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख
कळंब : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम ( माजी राष्ट्रपती) जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२- ०० वा. नगर पंचायत भवन पाण्याच्या टाकी जवळ कळंब येथे मददगार फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश नाटकर जिल्हा प्रकल्प प्रमुख पाणी व स्वच्छता मिशन जि. प. यवतमाळ, फिरोज पठाण जिल्हा प्रकल्प प्रमुख महा आयटी यवतमाळ ,धीरज स्थुल तहसीलदार कळंब, येमाजी धुमाळ मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब, राहुलजी राऊत मुख्याधिकारी वर्ग १ (राज्यसेवा 2022), राजेश राठोड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळंब,अभियंता मनोहर शहारे राज्य सचिव महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, राजू मडावी विस्ताराधिकारी (शिक्षण) जि.प. यवतमाळ, डॉ प्रशांत गावंडे यवतमाळ , हेमंत कुमार कांबळे जेष्ठ साहित्यिक ,इ. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे .
या प्रसंगी ज्या व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व संघर्ष करून शिक्षण ,सामाजिक व क्रीडा तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केले अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा/विदयार्थ्याचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कारमुर्तीना अग्निपंख पुस्तक , सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येईल .
तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे अशी विनंती आयोजका तर्फे करण्यात आली आहे.