टॉप बातम्या

जीएस ऑइल कंपनीच्या टाकीत तरुणाचा संशयास्पद मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर मार्गावरील जीएस ऑइल कंपनीच्या आवारातील पाण्याच्या उघड्या टाकीत अंदाजे 32 वर्षीय मनोज वानखडे (रा. नवीन वागदरा) याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी सुमारास ही घटना उघडकीस आली.

घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले असून प्रथमदर्शनी ही घटना हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

मंगळवारीच मनोज वानखडे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर तपासाचा धागा अधिक घट्ट झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे पोलिस तपासाची दिशा त्या अंगानेही वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();