टॉप बातम्या

वणीतील महिला छळप्रकरणातील आरोपी अटकेत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील भालर रोड परिसरात ३४ वर्षीय महिलेला कार समोर अडवून जबरदस्तीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी आरोपी सुनील भाऊराव मोहितकर (वय ५५, रा. जैन लेआऊट, हनुमान मंदिराजवळ, वणी) याच्याविरुद्ध कलम ७४, ७५, ७८, ८७, २९६, ३५२, ३५१(२), ३५१(३) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महिला (वय ३४, रा. देशमुखवाडी, श्रीहरी अपार्टमेंट, प्लॅट नं. १०४, वणी, व्य. सरकारी नोकर, WCL) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करत शारीरिक व मानसिक छळ केला.

फिर्यादी स्कुटरने भालर रोडने जात असताना आरोपीने त्याच्या हेरिअर कारने तिचा पाठलाग करून स्कुटरसमोर गाडी थांबवली. त्यानंतर जबरदस्तीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. फिर्यादीने विरोध दर्शविल्यानंतर आरोपीने कारमधून चाकू काढून तिच्या गळ्याजवळ लावत “गाडीत बस नाहीतर जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिली.

महिलेच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने एमसीआर दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रियांका चौधरी या करत आहेत.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();