सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
गावातील नागरिकांनी शेवटी शिवसेना वणी उपतालुका प्रमुख अनिल उलमाले यांच्या नेतृत्वात विश्वासभाऊ नांदेकर यांची भेट घेऊन हा गंभीर प्रश्न मांडला. नांदेकर यांनी कोणताही विलंब न करता संबंधित विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि पालकमंत्री संजय राठोड तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून रस्ता दुरुस्तीचे काम तत्काळ मंजूर करून घेतले. या तत्परतेमुळे ग्रामस्थांमध्ये नांदेकर यांच्याबद्दल प्रचंड समाधान व आदरभाव निर्माण झाला आहे.
वणी : तालुक्यातील दहेगाव (घोन्सा) येथील ग्रामस्थांनी आज वणी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भेट देऊन माजी आमदार तथा यवतमाळ-चंद्रपूर लोकसभा समन्वयक विश्वासभाऊ नांदेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून गाव ते मुख्य रस्त्यापर्यंतचा मार्ग अत्यंत खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक लोकप्रतिनिधींना विनंती करूनही रस्ता दुरुस्तीचा प्रश्न कायम प्रलंबित होता.
या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावकरी आज मोठ्या संख्येने वणी येथील शिवसेना कार्यालयात हजर झाले. या वेळी अनेक नागरिकांनी विश्वास भाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित केला. यावर विश्वास भाऊ नांदेकर यांनी तातडीने कारवाई करून अवैध दारू विक्री थांबवण्याचे आश्वासन दिले. या भेटीत ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खऱ्या अर्थाने तत्पर असलेल्या नेतृत्वाबद्दल समाधान व्यक्त केले.

