टॉप बातम्या

खुशाल येरगुडे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात – मार्डी सर्कलमध्ये ग्रामविकासाचा नवा संकल्प

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आगामी पंचायत समिती मारेगाव निवडणुकीत महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटना मारेगाव तालुका अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष खुशाल महादेव येरगुडे यांनी मार्डी सर्कलमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामविकास क्षेत्रात अनेक वर्षे काम करताना येरगुडे यांनी ग्रामीण भागातील विकासकामे, रोजगार हमी योजना आणि ग्रामसेवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा, रोजगार आणि विकासाचे साधन गावापर्यंत पोहोचावे हा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

अपक्ष उमेदवार म्हणून जनतेच्या विश्वासावर लढत देत असल्याचे सांगत येरगुडे म्हणाले की, “सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची आहे. गावोगावी विकासाच्या दिशेने काम करणे हेच माझे ध्येय आहे.” आगामी काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी रंगण्याची शक्यता असून, मार्डी सर्कलमधील ही लढत अधिक रंगतदार होणार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();