टॉप बातम्या

वणीच्या राजकारणात नवी खळबळ! सागर मुने पक्षाच्या वाटेवर — कोणता झेंडा हाती घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील ओळखले जाणारे समाजसेवक आणि संस्कार भारती तसेच सागर झेप संस्था या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणारे सागर मुने हे आता राजकारणाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. त्यांच्या या संभाव्य प्रवेशामुळे वणी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा माहोल सर्वत्र रंगू लागला आहे. विविध पक्ष आपल्या ताकदीची मोजदाद घेत असून, काही नव्या चेहऱ्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. अशात सागर मुने यांच्या नावाची राजकीय चर्चांमध्ये जोरदार वर्दळ आहे. ते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याबद्दल अद्याप स्पष्टता नसली, तरी त्यांच्या हालचालींनी अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सागर मुने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी सध्या मौन बाळगणं पसंत केलं. मात्र त्यांच्या या मौनातूनच काहीतरी मोठं राजकीय समीकरण घडण्याच्या शक्यतेने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सागर मुने यांच्या हालचालींमुळे वणीच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काही दिवसांत शहरातील राजकीय दिशानिर्देश पूर्णपणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

"मागील तीन वर्षांपासून मतदारांशी भेटी सुरु असून दांडगा जनसंपर्क वाढवला व 2024 ला जिल्हा परिषद व पोस्ट कॉलनी येथे भव्य तान्हा पोळा भरवल्याने संपूर्ण शहरात सागर मुने यांचे नाव झाले असून त्यांच्या प्रभागात जोरदार चर्चा सुरु झाली होती. होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा रंगत आहे. "
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();