टॉप बातम्या

मारेगावमध्ये कृषी अधिकाऱ्यांविरोधात घंटानाद आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : बोथरा एग्रोकेअर आणि काही कृषी केंद्रधारकांच्या मनमानीविरोधात तसेच तहसील कृषी अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीच्या आरोपांवर कारवाईची मागणी करत मारेगाव तहसील कार्यालयासमोर दोन तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले “कलेक्टर जवाब दो” घंटानाद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.

शेतकरी विलास रायपुरे आणि गजानन चंदनखेडे यांनी २३ जून ते १३ ऑक्टोबर दरम्यान कृषी केंद्रधारकांविरुद्ध अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दोघांनी कृषी विभागाविरोधात आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान कृषी विभागाने एका बंद लिफाफ्यात पत्र देत बोथरा एग्रोकेअरचा खत परवाना ऑगस्ट महिन्यात १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली.

मात्र, या कारवाईची अधिकृत प्रत शेतकरी विलास रायपुरे आणि गजानन चंदनखेडे यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे तहसील कृषी विभागाची कार्यपद्धती आणि पारदर्शकतेवर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तहसील कार्यालयासमोर सलग दोन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आता शेतकरी वर्गात चर्चा रंगली आहे की, या आंदोलनाच्या दबावामुळे संबंधित कृषी अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();