टॉप बातम्या

मारेगाव : शिवसेना (शिंदे गट) कडून आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांना आवाहन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे निवडणूक तयारीला सुरुवात करण्यात आली असून, स्थानिक स्तरावर उमेदवार निवडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी जाहीर केले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती मारेगाव गटातील निवडणुका लढविण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी थेट त्यांच्या संपर्कात यावे. पक्षाच्या धोरणानुसार आणि संघटनात्मक निकषांनुसारच उमेदवारांची निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

किन्हेकार यांनी पुढे सांगितले की, शिवसेना (शिंदे गट) ही जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे योग्य, निष्ठावान आणि जनसंपर्कात सक्रिय असलेल्या व्यक्तींना संधी दिली जाईल. पक्षाने कार्यकर्त्यांना एकत्र राहून आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला मजबुती देण्याचे आवाहन केले असून, मारेगाव तालुक्यात पक्षाची पकड अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे.

~विशाल किन्हेकार 
शिवसेना तालुका प्रमुख, मारेगाव
संपर्क : +918668364937
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();