सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : बीजेपी नेते तथा वणी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आणि समाजसेवक श्री विजयबाबू चोरडिया यांनी आज औपचारिकरित्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या भव्य सोहळ्यात मा. ना. एकनाथजी शिंदे शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री, तसेच मा. ना. संजयभाऊ राठोड, पालकमंत्री यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
या वेळी आशिष वसंतराव काळे (सामाजिक कार्यकर्ते), राहुल मुंजेकर, तसेच सुरेशजी चिंचोळकर (राज्य संचालक, पणन महासंघ) यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली. या सर्वांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून जनसेवेच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
प्रवेश सोहळ्याच्या वेळी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, सुदाम पवार, विधानसभा संघटक चंद्रकांत घुगगुल आणि शहर प्रमुख शिवराज पेचे यांची उपस्थिती होती. या प्रवेशामुळे वणी शहर व परिसरातील शिवसेनेला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.