टॉप बातम्या

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम,पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला हातभार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : सामाजिक बांधिलकी जपत नेहमी समाजकार्याच्या आघाडीवर राहणाऱ्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता आर्थिक मदत म्हणून धनादेश प्रदान करण्यात आला.

यावेळी धनादेश सचिनकुमार कुलमेथे, सहायक निबंधक, यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे आणि शाखा व्यवस्थापक प्रविण नांदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या पतसंस्थेचे हे पाऊल इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();