टॉप बातम्या

“विश्वकल्याणाची भावना हेच खरे हिंदुत्व” — डॉ. प्रणाम सदावर्ते

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून चारित्र्यवान व्यक्ती घडतात. आज संघाच्या प्रेरणेने जगभरात दोन लाखांहून अधिक सेवा प्रकल्प सुरू आहेत. विश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व असून, भारतीय जीवनपद्धती जगाचे मार्गदर्शन करू शकते,” असे मत सेवांकुर प्रकल्पाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रणाम सदावर्ते यांनी व्यक्त केले. ते वणी नगर येथे आयोजित विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बबनराव झोलबाजी धानोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका संघचालक हरिहर भागवत तर नगर संघचालक किरण बुजोने होते. डॉ. सदावर्ते यांनी सांगितले की, संघ शाखांमधून चारित्र्यवान स्वयंसेवक तयार होत असून, त्यांच्या माध्यमातून समाज परिवर्तन शक्य आहे.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तनातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण बुजोने यांनी केले, तर संचालन कवडू पिंपळकर यांनी केले.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();