सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मार्डी शिवारात फिस्की जंगलाला लागून असलेल्या शेतात जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन ठेक्याने शेती करणाऱ्या शामसुंदर उद्धव कुमरे (वय ३३) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. शनिवारी शेतात गेलेले शामसुंदर रात्री घरी परतले नाहीत. रविवारी (ता. 19) सकाळी नातेवाईकांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह शेतातच आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.