सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील जैताई मंदिरामध्ये स्वदेशी खादी भंडार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खादीच्या विविध वस्तूंवर आकर्षक सवलत योजना घेऊन आले आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी स्थानिकांना स्वदेशी उत्पादनांचा मनमोकळा पर्याय येथे उपलब्ध झाला आहे.
भंडारात खादी हाफ शर्ट, फुल शर्ट, मोदी कुर्ता, फॅन्सी जूट बॅग, गाऊन, पॅन्ट, टॉवेल, सलवार, ओढणी यांसारख्या सर्व प्रकारच्या खादी आणि कॉटन वस्तू मनपसंद दरात मिळत आहेत. विशेष म्हणजे सर्व उत्पादने दर्जेदार कापडातून स्थानिक कारागिरांनी तयार केलेली असून, परंपरा व आधुनिकतेचा सुंदर संगम ग्राहकांना येथे पाहायला मिळतो.
“आपला सण – आपली खादी” या घोषवाक्याने प्रेरित होऊन वणीतील नागरिकांनी या स्वदेशी उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दिवाळीपूर्वी आकर्षक खरेदीसाठी स्वदेशी खादी भंडार, जैताई मंदिर, यवतमाळ रोड वणी येथे भेट द्यावी.