टॉप बातम्या

लेतुजी जुनघरे यांचे कार्य कोलाम समाजासाठी बहुमूल्य होते-सौं इंदिरा बोन्दरे


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

झरी : आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते, कोलाम समाजातील ठाण्या वाघ, समाजातील अभ्यासू व्यक्ती राजकारणात विरोधक सुद्धा आदराने नाव घेणारे मा लेतुजी जुनघरे आपल्याला सोडून गेले आहे. बालपणापासून समाजाची सेवा करणारे आपल्या जाण्याने समाजामध्ये पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून निघणारी नाही.सरपंच ते सभापती संविधनिक पदे भूषवली आहे.त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. दिनांक १०/१०/२०२५ रोजी यवतमाळ येथील आदिवासी आक्रोश भव्य मोर्चा मध्ये आवर्जून त्यांची भेट झाली व त्यांनी माझ्या कार्याच तोंड भरून कौतुक केले व सांगितले कि, आपल्या समाजात तुझ्यासारख्या बहादूर महिला तयार होत नाहीत त्यामुळे समाजाचे कार्य करत राहा असा शेवटचा आशीर्वाद दिला त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे अपुरे कार्य पुढं करण्याचा संकल्प कोलाम समाजातील सर्व कार्यकर्त्याने करावा तरच त्यांना श्रद्धांजली ठरेल अशी दुःखद भावना सौं इंदिरा बोन्दरे यांनी व्यक्त केली व लेतुजी जुनघरे यांनी कोलाम समाजासाठी निरंतर आंदोलन मोर्चे सुरूच ठेवले व यवतमाळ येथील आंदोलन शेवटचे ठरले आज ते आपल्यात हयात नाही.त्यांची जागा कोणी घेऊ शकणार नाही. त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

-सौं इंदिरा बोन्दरे 
प्रदेश अध्यक्ष शामादादा कोलाम ब्रिगेड 
तथा बिगर सातबारा शेतकरी संघटना
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();