सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : वणी शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सकाळ समूहा’ तर्फे ‘सन्मान कर्तृत्वाचा’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
डॉ. नगराळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरात स्त्रीरोग उपचार सेवा, मातृत्व आरोग्य संवर्धन आणि सामाजिक आरोग्य जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांच्या आयुष्यात आरोग्यदायी बदल घडले असून, ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या आशेचा किरण ठरल्या आहेत.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून सकाळ समूहातर्फे नुकताच ‘सन्मान कर्तृत्वाचा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानानंतर वैद्यकीय क्षेत्रासह वणी शहरातील नागरिकांकडून डॉ. संचिता नगराळे यांचे सर्व स्तरावरून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. नगराळे यांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत, “हा पुरस्कार माझ्या रुग्णांचा आणि समाजाचा आशीर्वाद आहे. यामुळे पुढेही अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली,” अशी भावना व्यक्त केली.
