टॉप बातम्या

“सायकल बँक” उपक्रमात सहभागी व्हा – विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी गती द्या!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिक्षणाच्या प्रवासात अनेक विद्यार्थी केवळ साधनांच्या अभावामुळे मागे पडतात. अशा विद्यार्थ्यांसाठी “सायकल बँक” हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वापरात नसलेल्या सायकली गोळा करून त्या स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ज्यांच्या आई-वडिलांचे सावली नसते, परंतु ते शिक्षणात प्रगती करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना सायकलच्या माध्यमातून शाळा-कॉलेज गाठणे सुलभ करणे. सायकल मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाच्या गतीला नवा वेग मिळेल.

स्माईल फाउंडेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “आपल्या घरात वापरात नसलेली सायकल पडून असेल तर ती दान करून एखाद्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणा.”

आपल्या परिसरातील अशा विद्यार्थ्यांची माहिती किंवा सायकल दान करण्याची इच्छा असल्यास कृपया संपर्क खालील नंबर वर संपर्क साधा — मो. 7038204209.

एक छोटी सायकल, एका मोठ्या स्वप्नाची पूर्तता ठरू शकते! 


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();