सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरालगत वणी–वडगाव (टीप) मार्गावरील गजानन नगरी लेआऊट परिसरात एका युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. मृत युवकाचा गळा चिरून तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचा संशय असून मृताची ओळख अजय किशोर राऊत (वय ३२, रा. रंगनाथ नगर, वणी) अशी झाली आहे.
अजय गुरुवारपासून बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. प्राथमिक तपासानुसार खून गुरुवारी रात्री दरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.