टॉप बातम्या

भाऊबीजच्या निमित्ताने बहिणीसाठी खास भेट — स्वदेशी खादी भंडारात हिट ऑफर्सची मेजवानी!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : सणासुदीचा मोसम सुरू असून, दसरा दिवाळी आणि आता भाऊबीजच्या निमित्ताने आपल्या बहिणीसाठी काहीतरी खास गिफ्ट देण्याची संधी आली आहे. अशा वेळी स्वदेशी खादी भंडार, जैताई मंदिर परिसर, साई मंदिर चौक, यवतमाळ रोड, वणी येथे सुरु असलेल्या विशेष ऑफर्समुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या खादी भंडारात पैंजमा, मोदी जॅकेट, सलवार, फुल व हाल्फ शर्ट, पेपर खादी, संग्राम पठानी, व्हाईट फुल आणि हाल्फ शर्ट खादी टॉप साऊथ कॉटन गाऊन कॉटन पॅन्ट तसेच इतर अनेक आकर्षक ड्रेस मटेरियलवर माफक दरात सवलती दिल्या जात आहेत. खादीचे स्वदेशी कपडे केवळ परंपरेचे नव्हे, तर टिकाऊ व दर्जेदार फॅशनचे प्रतीक असल्याने, अनेक नागरिक आपल्या बहिणीसाठी आणि परिवारासाठी गिफ्ट घेण्यासाठी येथे गर्दी करत आहेत.
भाऊबीजच्या सणासाठी सुरू असलेल्या या ‘स्वदेशी हिट ऑफर्स’चा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आजच भेट द्यावी, असे आवाहन श्री. सतीश पाटील यांनी केले आहे. “तुमच्या बहिणीच्या आनंदात भर घालण्यासाठी आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वदेशी खादीपेक्षा उत्तम भेट दुसरी नाही,” असा संदेशही त्यांनी दिला. मर्यादित स्टॉक असल्याने ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();