सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : दिनांक 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत “संविधान बचाव” हा संदेश घेऊन काँग्रेसतर्फे दीक्षाभूमी, नागपूर येथून सेवाग्रामपर्यंत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले, तर महात्मा गांधींचे पणतू मा. तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीने या पदयात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
आज वर्धा येथे या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. संविधानाच्या जपणुकीसाठी, लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी व समाजातील समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांना पुन्हा अधोरेखित करण्यासाठी ही मोहीम एक प्रेरणादायी सोहळा ठरला.
ही पदयात्रा फक्त चालण्याचा प्रवास नसून लोकशाहीच्या पायाभूत मूल्यांना नव्याने बळकटी देणारा उपक्रम ठरला आहे. यातून समाजात एकतेचा संदेश पोहोचला असून सहभागी कार्यकर्त्यांनी गांधीवादी विचारसरणी आणि संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.
या पदयात्रेत प्रदेश सचिव संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.