सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी: स्थानिक रंगनाथ नगर येथील राखी सचिन लोहकरे (३८) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे दिवंगत कर्मचारी त्र्यंबक वितोंडे यांच्या त्या कन्या होत्या. नागपुरला उपचारादरम्यान एक ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास यांची प्राणज्योत मालवली. वणीतील मोक्षधाम येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, आई असा बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.