सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मुंबई : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्या यांच्यासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सदस्यपदाचे आरक्षण ठरविण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
महत्वाच्या तारखा :
• 10 ऑक्टोबर 2025 : जिल्हाधिकारी वृत्तपत्रांद्वारे सूचना प्रसिद्ध करतील
• 13 ऑक्टोबर 2025 : आरक्षण सोडत व प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध
• 14 ते 17 ऑक्टोबर 2025 : हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत
• 3 नोव्हेंबर 2025 : अंतिम आरक्षणाची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध
दरम्यान, राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर होणार आहे. या याद्यांवर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल. विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच नावे व पत्ते कायम ठेवले जाणार असून नवीन नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे ही कार्यवाही आयोगाकडून होणार नाही. मात्र, विभागणीतील चुका किंवा चुकीचे प्रभाग वाटप यासंदर्भात हरकती दाखल करता येतील.