टॉप बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येनक गावात पवन ऋषी कोडापे (वय 33) या विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पवन हा मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री त्याने आत्महत्या केली असून बुधवारी सकाळी त्याचा भाऊ सोहन कोडापे यांना ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.

शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, वणी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();