टॉप बातम्या

सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीत फार्मासिस्ट दिनानिमित्त भव्य कार्यक्रम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : २५ सप्टेंबर रोजी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून वणी-वरोरा मार्गावरील सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीत एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाद्वारे फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना, व्यावसायिकतेचा संकल्प आणि समाजसेवेची जाणीव दृढ झाली. विशेष म्हणजे, फार्मासिस्ट शपथेच्या माध्यमातून भावी आरोग्यसेवा व्यावसायिकांनी नैतिकतेचे पालन आणि संवेदनशील सेवा देण्याची शपथ घेतली.

हा कार्यक्रम कॉलेजचे प्राचार्य श्री. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री. प्रदीप बोंगिरवार यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. फार्मसी व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित करून पुढील पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();